यात वाईट काय आहे?

यात वाईट काय आहे?

यात वाईट काय आहे?

मदत मागण्यात लाज बाळगू नका. जर तुम्ही घायाळ असाल आणि तुम्हाला एखाद्या सोबत्याची गरज असेल जो तुमची मदत करू शकेल, तर यात वाईट काय आहे ?- सम्राट मार्कस ऑरेलियस

जॉब मागणारे नव्हे तर जॉब देणारे बना ! म्हणायला सोपं आणि प्रत्यक्षात उतरवायला तेवढंच अवघड आहे. बऱ्याचदा अशा घोषणा करणारेच यात अपयशी ठरलेले आढळतात. तरुण म्हणतो, आधीच शैक्षणिक कर्जात आकंठ बुडालो, आता जॉबची अपेक्षा नाही करायची तर काय व्यवसाय करायचा. व्यवसायासाठी भांडवल कोण देणार? ज्यांना मदत मागायची ते यापूर्वी दिलेले कर्ज मागतात. तेच आम्हाला वेळेवर फेडता आले नाही तर पुढचं भांडवल उभारायचं कोठून ! तरुण म्हणतात ते चुकीचं नाही. ते त्यांच्या अनुभवातून बोलतात. परंतु निराशावादी बोलणं हेही तर चुकच असतं ना! स्पर्धा परीक्षांद्वारा फुकट नोकरी मिळते तिथे अट एकच असते ती म्हणजे लेखी परीक्षा उत्तीर्ण करण्याची.

मात्र त्याबाबतीत उदासीनता एवढी की, त्याच परीक्षांचा अभ्यास तेव्हा सुरू केल्या जातो जेव्हा सर्व पर्याय संपतात. अलीकडे तर मुलगा/मुलगी अकरावीत गेली की त्यांना फक्त डॉक्टर, इंजिनियर होण्याचेच वेध लागतात. त्यांना त्याशिवाय काही सुचतच नाही. पालकवर्ग सुद्धा तेच स्वप्न बाळगून असतो. म्हणजे त्यांचा उद्देश तेवढ्यापुरताच मर्यादित असतो. त्यात अगदी नगण्य विद्यार्थी असे असतात जे स्पर्धा परीक्षांची माहिती मिळवितात. ज्यांना स्पर्धा परीक्षेतील विषयांत गोडी निर्माण होते ते पंचविशीच्या आतच चांगली पदे मिळवितात. ज्यांना उशिरा जाग येते त्यापैकी काही तग धरतात, तर काही मध्येच सोडून पुन्हा नेट/सेट, पीएचडी वा इतर कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून पदव्या जमा करण्यातच आणि त्यातून मिळणाऱ्या अल्पशा मानधनात समाधान मानतात.

 

हे खरं असलं तरी पूर्णसत्य नाही :

आम्ही अमूक अमूक कार्य करण्यासाठी काही जणांकडे मदत मागितली परंतु आम्ही ते करू शकू याचा त्यांना विश्वासच नसावा म्हणून त्यांनी मदत नाकारली. असं जेव्हा तरुणवर्ग सांगतो ते खरंच असतं. भारतीय समाज उत्सवप्रिय आहे. त्यांना वाढदिवस, लग्न, गाडी, घर यावर अंदाधुंद पैसा खर्च करण्याची भारीच हौस. मात्र आपल्यातीलच एखाद्या कर्तृत्ववानाला मदत करण्यात ते दहादा विचार करतात, शक्यतो नकारच देतात. समजा एखाद्याने मोठ्या मनाने मदत केली तर ती त्याला लवकर परत हवी असते. जेव्हा व्यवसायाला अधिक भांडवलाची गरज असते तेव्हाच यांचा परत मागण्याचा धोशा सुरू होतो. यांना कितीही समजावून सांगितले तरी ते ऐकत नाहीत.

अशात अनेकांचे उभे केलेले व्यवसाय भांडवलाच्या अभावी बुडतात. अपयशाचा ठप्पा अनेकांच्या जिव्हारी लागतो. ते तेथेच तलवार म्यान करतात आणि कसंतरी जीवन कंठतात. परंतु काहीजण चिवट असतात. ते भांडवलाच्या उभारणीसाठी मदतीची याचना करायला मागेपुढे पाहत नाहीत. आणि यात काहीही चुकीचं नसतं. तुम्हाला काहीही योगायोगानं मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न करावेच लागतात आणि जे प्रयत्न करतात, प्रयत्न करण्याचे थांबवत नाहीत त्यांना कोठून ना कोठून मदत मिळतेच. पुढे ते यशस्वी होतात. म्हणून मदत मिळतच नाही, हे पूर्णसत्य नाही.

 

ध्येय असावेच :

आपल्याला काय करायचंय याविषयी आपण स्पष्ट असावं. कोणत्याही गोष्टीची स्पष्टता असेल तर ते काम होण्याची शक्यता वाढते. हॉर्वर्ड विद्यापीठाचे संशोधक डेव्हिड आर. टोपोर यांनी ध्येयाबाबत ‘ऑपरेशनलाईज’ ही पद्धत अवलंबण्याची सूचना केलीय. जसे तुम्हाला तुमचं वजन दोन किलोने घटवायचंय! हे तुमचं लक्ष्य झालं. परंतु तुम्ही त्यात हे शब्द जोडले, ‘मला दोन किलो वजन कमी करायचंय कारण माझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसारखंच मला खेळता येईल आणि त्यांच्यासारखंच मी तंदुरुस्त दिसेल’, तर तुमचं लक्ष गाठणं तुम्हाला अधिक सोपं जाईल. कारण तुमचं चेतन मन त्याला लगेच स्वीकृती देईल. चेतन मनाने दिलेली स्वीकृती अवचेतनला आदेश स्वरूपात मिळाली की तुमचं ध्येय गाठणं सोपं होईल. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमचं ध्येय दररोज कागदावर उतरावं लागेल. तुमचं ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या कामाची सवय लांगेपर्यंत तुम्हाला ते सातत्याने करावे लागेल.

 

देणारेच बना :

सन्मान देणे, मोठ्यांना मान देणे, दुसऱ्याच्या यशासाठी प्रार्थना करणे, मनापासून दुसऱ्याच्या यशात सहभागी होणे याला पैसे लागत नाहीत, मात्र मोठं मन असावं लागतं. एवढं देण्याची प्रवृत्ती आपण जोपासायलाच हवी. आपल्याला माहिती असलेलं मार्गदर्शन दुसऱ्याला केल्यानं तुमचं ज्ञान कमी होत नाही उलट त्यात वाढच होते. ही वाढ आपल्या जीवनातील सर्वच क्षेत्रात व्हावी यासाठी जे जे आपल्याला देता येतं ते नम्रतेने देण्याची भावना विकसित करा. ही देण्याची भावना तुमच्या जीवनातही चमत्कार घडवून आणेल !

 

आगामी परीक्षा

आठवड्यातील निकाल

MPSC - महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक
शारीरिक चाचणी दिनांक : 17-27 डिसेंबर 2024 

वेबसाईट : www.mpsc.gov.in

MPSC - प्राध्यापक - विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ, नंदुरबार संवर्गाचा निकाल
निकाल दिनांक : 13 नोव्हेंबर 2024

वेबसाईट : https://www.mpsc.gov.in

MPSC - सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ, संशोधन
अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ व निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब 
परीक्षा दिनांक : 25 आणि 27 डिसेंबर 2024 
वेबसाईट : www.mpsc.gov.in

MPSC - इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा 2024 
निकाल दिनांक : 12 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://www.mpsc.gov.in

UPSC - केंद्रीय नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
परीक्षा दिनांक : 25 मे 2025 
वेबसाईट : www.upsc.gov.in

MPSC - निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) - 2022 '
निकाल दिनांक : 8 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://www.mpsc.gov.in

Railway Exam
Assistant Loco Pilot 
परीक्षा दिनांक : 25 ते 29 नोव्हेंबर 2024

India Post Circle - GDS 2024 4th Merit List
निकाल दिनांक : 13 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://indiapostgdsonline.gov.in 

RPF SI
परीक्षा दिनांक : 2 ते 12 डिसेंबर 2024

AIIMS New Delhi -Nursing Officer (NORCET-7) 2024 Stage-II Counselling Result 
निकाल दिनांक: 12 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://www.aiimsexams.ac.in

Technician
परीक्षा दिनांक : 18 ते 29 डिसेंबर 2024

Junior Engineer
परीक्षा दिनांक : 13 ते 17 डिसेंबर 2024 
वेबसाईट : https://indianrailways.gov.in

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *