साहित्याचं नोबेल मिळविणारी पहिली एशियन महिला : हान कांग

2024 वा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या हान कांग या आशियाच्या पहिल्याच महिला लेखिका: आपल्या ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीसाठी बुकर प्राईझ मिळविणाचाही रया कोरियाच्या पहिल्याच लेखिका.
पहिली एशियन महिला – हान कांग
द. कोरियाच्या ग्वांगझु येथे 1970 मध्ये जन्मलेल्या हान कांग यांना 1980 च्या दशकात अगदी लहानपणातच राजकीय दडपशाहीला सामोरं जावं लागलं. बालपणातील कोवळ्या मनावर उमटलेले दुःखाचे, निराशेचे, मानवी क्रूरतेचे व्रण त्यांच्या लिखाणातून डोकावतात. हान कांगचे वडीलसुद्धा तेथील सुप्रसिद्ध रचनाकार, कथाकार, साहित्यकार होते.
प्रतिष्ठित उपन्यासकार म्हणूनच त्यांची ओळख होती. वडिलांचं शब्दधन हान कांगमध्ये उतरलं. त्याचाच परिणाम म्हणजे 1993 मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘साहित्य व समाज’ प्रसिद्ध झाला.
पहिल्याच काव्यसंग्रहात त्यांनी मनुष्याच्या कोमल भावनांचा संबंध आपल्या रचनेत मांडला. त्यानंतर त्यांचा लघु कहाणी संग्रह ‘लव्ह ऑफ यीसु सु’, ‘युवर कोल्ड हॅण्ड’, द व्हाईट बुक, द व्हेजिटेरियन असे एकाहून एक सरस साहित्य प्रकाशित झाले. पैकी ‘द व्हेजिटेरियन’ला 2016 चा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार मिळाला.
हान कांग यांच्या सर्व साहित्यात रूपकं आणि प्रतिकांचा वापर करण्यात आला आहे. रूपकांच्या भोवती फिरणाऱ्या या कथांमध्ये सत्ता, परिवार, शासन, अत्याचाराचा विरोध दर्शविण्यात आला आहे. म्हणूनच नोबेल समितीनेही ‘ऐतिहासिक आघातांना तोंड देणाऱ्या आणि मानवी जीवनातील नाजूकपणा उघड करणाऱ्या तिच्या काव्यात्मक गद्यासाठी हा सन्मान हान कांग यांना जातो’ असं म्हटलं आहे.
एखाद्याचं संवदेनशील मन किती उदार असू शकतं याचं उदाहरण हान कांग यांच्या प्रत्यक्ष लिखाणातून जसं व्यक्त होतं तसंच ते वागण्यातूनही व्यक्त होतं. म्हणूनच बुकर, नोबेल सारखे अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मिळूनही त्यांनी आनंदोत्सव साजरा केला नाही. उलट द. कोरियात त्यांना मिळालेल्या पुरस्काराचा जल्लोष सुरू असतानाही ‘आपल्याच जगात इतकी निरपराध माणसं युद्धात मरत असताना आपण काही साजरं कसं करायचं?’ असं त्या विचारतात.
अतिशय कमी शब्दात त्यांनी जीवहत्या, मनुष्यावर होणारे अत्याचार, त्याच्या वेदना, अशा परिस्थितीत त्याचा होणारा कोंडमारा, यातून येणारी निराशा इत्यादी बाबी. जिवंतपणे मांडल्या आहेत. मानवी दुःख किती पराकोटीचं असू शकतं आणि ते कसं दडपून टाकल्या जातं. त्याचा मनावर आणि शरीरावर कसा परिणाम होतो हे त्यांनी प्रतीकांच्या माध्यमातून जगासमोर आणून एका नवीनच वैचारिकतेला वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.
याच संवेदनशील वैचारिकतेचा नोबेल समितीने सर्वोच्च बहुमान देऊन सन्मान केला, हे खरं तर कौतुकास्पदच म्हणावं लागेल.
आगामी परीक्षा | आठवड्यातील निकाल |
LL.M CET 2024-2025 Examination (University of Mumbai) | जिल्हा न्यायालय सांगली, ठाणे, नंदुरबार लिपिक मराठी टायपींग निकाल वेबसाईट : https://thane.dcourts.gov.in |
UPSC - केंद्रीय नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 | Union Bank of India (500 Apprentice Post) निकाल दिनांक: 8 नोव्हेंबर 2024 वेबसाईट : https://www.unionbankofindia.co.in |
BIS - भारतीय मानक ब्यूरो (345 Posts) परीक्षा दिनांक : 9-21 नोव्हेंबर 2024 वेबसाईट : https://ibpsonline.ibps.in | IBPS-CRP RRB XIII (Officer Scale I, II & III) 2024 Online Main Exam Result निकाल दिनांक : 4 नोव्हेंबर 2024 |
SSC- CHSL Exam 2024 (Tier-II) परीक्षा दिनांक : 18 नोव्हेंबर 2024 | UPSC – NDA & NA (I) 2024 OPEL Final Result वेबसाईट : https://www.upsc.gov.in |
CDCC - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक परीक्षा दिनांक : 15, 16, 17 नोव्हेंबर 2024 वेबसाईट : https://www.cdccrecruitment.in | LIC HFL-Junior Assistant वेबसाईट : https://www.lichousing.com |
MPSC - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 |
SURE SHOT
महत्त्वाचे दिवस... | चर्चित पुस्तक आणि लेखक | स्मरणशक्ती तपासा |
3 नोव्हेंबर - जागतिक जेलीफिश दिवस 5 नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस 23 नोव्हेंबर - राष्ट्रीय काजू दिवस 26 नोव्हेंबर - भारताचा संविधान दिन | चॅलेंजेस टू इंटर्नल सिक्युरिटी - अशोक कुमार व विपुल अनिकांत द लाइफ इम्पॉसिबल - मॅट हेग मॉन्स्टर्सच्या बागेत- क्रिस्टल किंग द मायटी रेड-लुईस एरड्रिच गर्ल पॉवर : इंडियन वूमेन हू बोक द रूल्स- नेहा जे. हीरानंदानी चंद्रशेखर : द लास्ट | 1. डायनामाइटचा शोध कोणी |