यश मिळवण्यासाठी लक्ष्य निश्चिती आवश्यक

यश मिळवण्यासाठी लक्ष्य निश्चिती आवश्यक

   प्रियंका क्षीरसागर भारती, विभागीय अभियंता, दक्षिण रेल्वे, नागपूर- यश मिळवण्यासाठी लक्ष्य निश्चित असायलाच हवे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर लक्ष्य निश्चित असायलाच हवे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे लक्ष्य निश्चित करून दिल्लीत गेले. क्लासेस लावलेत, तेव्स फक्त 100 टक्के क्लासेस आणि अभ्यासावर फोकस केले.

त्याकाळात अभ्यास म्हणजे अभ्यास. मोबाईल नाही, टीव्ही नाही, वृत्तपत्राचे वाचन आणि अभ्यास यापलीकडे जीवनात काहीच नव्हते. या जिद्द आणि चिकाटीमुळेच पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या प्रियंका क्षीरसागर भारती.

प्रियंका क्षीरसागर- भारती यांचे मूळ गाव अंबाजोगाई (मराठवाडा). दहावी पर्यंतचे शिक्षण अंबाजोगाई येथील अन्थोनी : स्कूल येथेच झाले. अकरावी आणि बारावीचे शिक्षण राजश्री शाहू महाविद्यालयात झाले. बारावीत चांगले गुण मिळाल्याने अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे एकल महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठ या महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला.

पदवी घेतल्यानंतर दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी गेल्यात. तेथे ‘गेट’ ची तयारी केली. त्या परीक्षेतही यश आले. तीच तयारी करीत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकीची परीक्षा दिली. स्पर्धा परीक्षेसाठी माझा मोठा भाऊ तेजल गणपत क्षीरसागर याने मार्गदर्शन केले.  वडील गणपतराव क्षीरसागर हे टेक्स्टाईल इंजिनिअर असल्याने आपणही अभियंता व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.

त्यानुसार अभ्यास केला आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आई राखी ही गृहिणी. या दोघांनी केलेल्या संस्कारामुळेच यशाचे शिखर गाठू शकले, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. मोठ्या भावाने केलेल्या मार्गदर्शनामुळे यशाचे शिखर सर करताना अडचणी गेल्या नाहीत. भाऊ तेजल हे जालना येथील नाबार्ड बँकेत जिल्हा विकास अधिकारी आहेत.

एमटेकसोबतच आयईएसचा अभ्यासः

भावाने केलेल्या मार्गदर्शनामुळे दिल्ली येथे गेले. तेथील क्लासेसमध्ये चांगले मार्गदर्शन मिळाले. परीक्षा काय वाचावे, याबद्दलही योग्य मार्गदर्शन तेथे मिळाले. गेल्या दहा वर्षांच्या पेपरचे ट्रेंड काय होते, तेही यानिमित्ताने कळालेत. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण कसे व्हायचे याबद्दलही अतिशय सोप्या पद्धतीने व योग्यरित्या मार्गदर्शन करण्यात येत होते.

यशस्वीतेसाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक

कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल तर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते प्रियंका यांना मोठ्या भावाकडून मिळाले. अडचणी कायम असतात. त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर त्यादृष्टीने कोणत्याही पदवीच्या पहिल्या वर्षांनंतरच तयारी करायला हवी. त्यासाठी मार्गदर्शन घ्यावे. अभ्यासक्रम कसा असतो, त्याची माहिती घ्यावी.

मला अंतिम वर्षाला परीक्षेच्या तयारीबद्दल कळाले. ते पूर्वीच कळले असते. तर लवकर तयारी करता आली असती. ती चूक तुम्ही करू नका, असा सल्ला त्या युवकांना देतात. महाराष्ट्रीयन युवक व युवतींमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, माहितीचा अभाव आहे. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनातच आपल्याला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्यादृष्टीने तयारी करण्यावर भर द्यावा.

अंतिम वर्षाच्या दोन वर्षापासून नियमित अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास करावा. हे करीत असताना घरच्यांचा सपोर्ट आणि प्रोत्साहनाची खूप गरज असते. त्याच्या जोरावरच विद्यार्थी पुढील यशाचे शिखर सर वडिलांपासून दूर राहत असतो. त्यामुळे भरकटण्याची भीतीही असते. दिल्लीसारख्या शहरात ती अधिकच असते.

त्यामुळे शिक्षणासाठी अथवा क्लासेससाठी, कशाही साठी जा, पण आपले लक्ष्य कायम हृदयात असायला हवे. पहिल्याच प्रयत्नात यश यावे, ही जिद्द बाळगावी. इच्छाशक्तीही हवीच. वृत्तपत्राचे वाचन हे सामान्यज्ञान वाढविण्यासाठी गरजेचे असते. त्यातील संपादकीय पान हे तुम्हाला दिशा अथवा आकलनात भर टाकत असते.

 

आगामी परीक्षा

आठवड्यातील निकाल

LL.M CET 2024-2025 Examination

(University of Mumbai)
परीक्षा दिनांक : 17 नोव्हेंबर 2024
वेबसाईट : https://mu.ac.in

जिल्हा न्यायालय सांगली, ठाणे,

नंदुरबार लिपिक मराठी टायपींग निकाल
निकाल दिनांक: 7 नोव्हेंबर 2024 

वेबसाईट : https://thane.dcourts.gov.in 

UPSC - केंद्रीय नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
परीक्षा दिनांक : 25 मे 2025
वेबसाईट : www.upsc.gov.in

Union Bank of India (500 Apprentice Post) 

निकाल दिनांक: 8 नोव्हेंबर 2024 

वेबसाईट : https://www.unionbankofindia.co.in


BIS - भारतीय मानक ब्यूरो (345 Posts)

परीक्षा दिनांक : 9-21 नोव्हेंबर 2024

वेबसाईट : https://ibpsonline.ibps.in

IBPS-CRP RRB XIII (Officer Scale I, II & III) 

2024 Online Main Exam Result

निकाल दिनांक : 4 नोव्हेंबर 2024
वेबसाईट : https://www.ibps.in/

SSC- CHSL Exam 2024 (Tier-II)

परीक्षा दिनांक : 18 नोव्हेंबर 2024
वेबसाईट : www.ssc.gov.in

UPSC – NDA & NA (I) 2024 OPEL Final Result
निकाल दिनांक : 24 ऑक्टोबर 2024

वेबसाईट : https://www.upsc.gov.in

CDCC - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक

परीक्षा दिनांक : 15, 16, 17 नोव्हेंबर 2024

वेबसाईट : https://www.cdccrecruitment.in

LIC HFL-Junior Assistant
2024 Final Result
निकाल दिनांक: 7 नोव्हेंबर 2024 

वेबसाईट : https://www.lichousing.com

MPSC - महाराष्ट्र राजपत्रित नागरी

   सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
परीक्षा दिनांक : 1 डिसेंबर 2024

SURE SHOT

महत्त्वाचे दिवस...

चर्चित पुस्तक आणि लेखक

स्मरणशक्ती तपासा

3 नोव्हेंबर - जागतिक जेलीफिश दिवस

5 नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस
6 नोव्हेंबर - युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
7 नोव्हेंबर - शिशु संरक्षण दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस
8 नोव्हेंबर - जागतिक रेडिओग्राफी दिवस
9 नोव्हेंबर राष्ट्रीय विधी सेवा दिन
10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन, जागतिक लसीकरण दिवस
11 नोव्हेंबर - युद्धविराम दिवस, राष्ट्रीय शिक्षण दिन
12 नोव्हेंबर - जागतिक निमोनिया दिन
13 नोव्हेंबर - जागतिक दया दिवस
14 नोव्हेंबर - बालदिन, जागतिक
उपयोगिता दिवस, जागतिक मधुमेह दिन
16 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय सहिष्णुता
दिवस, राष्ट्रीय पत्रकार दिन
17 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
19 नोव्हेंबर - जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
20 नोव्हेंबर - सार्वत्रिक बालदिन
21 नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिन

23 नोव्हेंबर - राष्ट्रीय काजू दिवस

26 नोव्हेंबर - भारताचा संविधान दिन

चॅलेंजेस टू इंटर्नल सिक्युरिटी - अशोक कुमार व विपुल अनिकांत 

द लाइफ इम्पॉसिबल - मॅट हेग
हक्क - रुमान आलम 

मॉन्स्टर्सच्या बागेत- क्रिस्टल किंग

द मायटी रेड-लुईस एरड्रिच
एक समंदर मेरे अंदर - संजीव जोशी
The book of life-विवेक अग्निहोत्री
फायर ऑन द गंगा- राधिका अय्यंगार
Pitchside- अमृत माथूर
लारा : द इंग्लंड क्रॉनिकल्स- ब्रेन लारा, फिल वॉकरसह
Dabbling of Deplomacy-एसडी मुनी
राम मंदिर - गीता सिंग
नियतीचे 4 तारे- एमएम नरवणे
संस्कृती के आयाम- मनोरमा मिश्रा
An Uncommon Love - चित्रा बॅनर्जी
कारगिल- ऋषी राज
माय लाइफ माय मिशन- उदय माहुरकर व रामदेव 

गर्ल पॉवर : इंडियन वूमेन हू बोक द रूल्स- नेहा जे. हीरानंदानी
रीथिंकिंग गुड गव्हर्नन्स- विनोद राय

चंद्रशेखर : द लास्ट
आयकॉन ऑफ आयडियो
मॅजिकल पोलिटिक्स माजक- हरिवंश व् रविदत्त वाजपेयी
क्रिकेट वर्ल्ड कप : द इंडियन चॅलेंज -आशीष रें


1. डायनामाइटचा शोध कोणी
लावला ?
2.'प्लेइंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे?
3.सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
4.पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
5.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
6.'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे?
7.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
8. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
9. राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे ?
10. ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे?
11. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला?
12. साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे?
13. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
14. भारताने आलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
15. राष्ट्रीय ग्राहक दिन के साजरा केला जातो ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *